Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तायक्वांडो ब्लॅक बेल्ट परीक्षेत जैन स्पोर्टस् अकॅडमीचे २५ खेळाडू उत्तीर्ण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडिया व तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई, यांच्या संयुक्त विद्यमाने २८ मे  रोजी छत्रपती संभाजीनगर, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ बॅडमिंटन हॉल येथे ब्लॅक बेल्ट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत १७७ खेळाडूंनी यशस्वी सहभाग नोंदविला. जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या २५ खेळाडूंनी या परीक्षेत यश संपादन केले. त्यांना प्रशिक्षक जयेश बाविस्कर, जळगाव, जीवन महाजन, रावेर, सुनील मोरे पाचोरा, श्रीकृष्ण चौधरी शेदूर्णी, श्रीकृष्ण देवतवाल शेंदूर्णी  यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.

 

ब्लॅक बेल्ट परीक्षा उत्तीर्ण खेळाडू पुढीलप्रमाणे: अर्णव अविनाश जैन , दानिश रहेमान तडवी , संकेत गणेश पाटील , हिमांशू महाजन , रूतीक कोतकर , निकेतन खोडके , निकीता पवार, निलेश पाटील (सर्व जळगाव ), नियती गंभीर , साहिल बागुल , प्रविण खरे , अमित सुरवाडकर, रूतीका खरे, जीवनी बागुल , रुपल गुजर (सर्व पाचोरा), जय गुजर, भावेश चौधरी , श्रीकृष्ण चौधरी, लोचना श्रीकृष्ण चौधरी, मोहित श्रीकृष्ण चौधरी (सर्व शेंदूर्णी ), हेमंत गायकवाड, यश शिंदे , यश जाधव, महिमा पाटील , दिनेश चौधरी (सर्व रावेर ) सदर यशस्वी खेळाडूंचे संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, सचिव अजित घारगे, सहसचिव रवींद्र धर्माधिकारी, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, सौरभ चौबे, महेश घारगे, कृष्णकुमार तायडे यांनी कौतूक केले.

Exit mobile version