Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तापी नदीत बुडून तरूणाचा मृत्यू

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील पाडळसे येथील ३७ वर्षीय तरूणाचा अंजाळे शिवारातील तापी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

दिपक दिनकर भारंबे (वय-३७) रा. पाडळसे ता. यावल ह.मु.निमखेडी शिवार, खोटे नगर, जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, दिपक दिनकर भारंबे हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. दरम्यान, त्याचा यावल तालुक्यातील अंजाळे शिवारातील तापी नदीतील काट्यांच्या झुडूपात मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान, आत्महत्या आहे की, पाण्यात बुडाला याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदीप सुर्यवंशी करीत आहे.

Exit mobile version