Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तापमान ४४ अंशावर

जळगाव, लाइव्ह ट्रेंड्स न्युज  -जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसापासून तापमान चढेच आहे. आज शुकवारी तापमान ४४ अंश पर्यंत पोचले असून त्यात अजून वाढ होण्याची शक्यता असल्याचे हवामान अभ्यासकांनी अंदाज वर्तविला आहे.

जिल्ह्यात राज्य हवामान विभागाकडून जिल्ह्यासह राज्यात तीन ते चार दिवस उष्णतेची लाट येण्याचे संकेत दिले होते. गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात तापमानात बरीच वाढ झाली आहे. जिल्ह्यात बुधवारी तापमानाचा पार ४४ अंशावर पोचला असून सर्वात जास्त ४४ अंश तापमान पाचोरा, धरणगाव, एरंडोल, अमळनेर आदी तालुक्यात नोंदवले गेले आहे. तर भडगाव, चोपडा, मुक्ताईनगर आदि तालुक्यात ४३ अंश नोंद झाली आहे. येत्या 1 ते 2 एप्रिल पासून उष्णतेच्या तीव्रतेत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे वेलनेस वेदर फौंडेशनचे हवामान अभ्यासक निलेश गोरे यांनी म्हटले आहे.

किमान तापमान स्थिर
मागील पंधरवड्यापासून किमान तापमान स्थिर आहे. किमान तापमान 21 ते 22 डिग्री सेल्सिअस दरम्यान स्थिर आहे. तीन ते चार एप्रिल पर्यंत किमान तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे यामुळे रात्री नऊ ते सकाळी दहा पर्यंत उन्हाच्या दाहकतेपासून काहीसा दिलासा मिळत आहे. मात्र ११ वाजेनंतर ३ ते वाजेपर्यंत उन्हाचा तडाख्याची दाहकता जाणवून येत आहे.

Exit mobile version