Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तांबापूरा येथे विनापरवाना रेशनचा गहू व तांदूळाची वाहतूक करणारा ट्रक पकडला; दोन जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील तांबापुरा परिसरातून विनापरवाना शासकीय धान्य दुकानाचा गहू व तांदूळ आयशर गाडीतून संशयास्पद घेऊन जात असताना सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी थांबवून चौकशी केली. विनापरवाना वाहतूक करतांनाचे निदर्शनास आले, चालक वाहन सोडून फरार झाला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात पुरवठा तपासणी अधिकारी यांच्या फिर्यादीवरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांना तांबापुरा परिसरातून शासकीय मालकीचा गहू व तांदूळाने भरलेला माल आयशर गाडीत भरून नेत असल्याचे दिसून आले. गुप्ता यांनी वाहन थांबवून वाहनांची चौकशी केली. दरम्यान (एमएच 17 एजी 7330) क्रमांकच्या आयशर गाडीला थांबवून तपासणी केली असता वाहनांमध्ये 131 गव्हाचे कट्टे व 141 तांदळाचे कट्टे असे आढळून आले. यासंदर्भात चालकाला घेऊन जाण्याचा पावती दाखवण्यास विचारपूस केली असता चालक शेख अन्वर उर्फ बबलू शेख गफार (रा. पाळधी ता.धरणगाव जि.जळगाव) हा वाहन सोडून फरार झाला आहे. दरम्यान वाहनांची अधिक चौकशी केली असता धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील वार्ड क्रमांक 38/1 मधील स्वस्त धान्य दुकान क्रमांक 68चे मालक शेख अहमद शेख निसार यांनी हा माल आपला असल्याचे सांगितले. दरम्यान शासकीय धान्य दुकानाचे बिल पावती मागणी केली असता बिल पावती नसल्याचे सांगून उडवाउडवीचे उत्तरे दिली. यावेळी पुरवठा तपासणी अधिकारी दिगंबर भिकन जाधव (वय-५१ रा. रायसोनी नगर) यांच्या उपस्थितीत पंचनामा जागीच करण्यात आला. दिगंबर जाधव यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी चालक शेख अन्वर उर्फ बबलू शेख गफ्फार आणि दुकान मालक शेख अहमद शेख निसार दोन्ही रा. पाळधी ता. धरणगाव यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version