Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तांबापूरा परिसरातून तरूणाची दुचाकी चोरट्यांनी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील तांबापूरा परिसरातून तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी २० फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वसीम शेख मुशीर (वय-३२) रा. तांबापूरा, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करीत आहे. १६ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता वसीमने त्याची दुचाकी (एमएच १९ डीएन ८२५५) ही दुचाकी घरासमोर पार्किंगला लावलेली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार १७ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीला आला. वसीमने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर सोमवारी २० फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहे.

Exit mobile version