Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तांबापूरा दंगल प्रकरण: परस्पर तक्रारीवरुन गुन्हा; अटकसत्र सुरूच

जळगाव प्रतिनिधी । हळदीच्या कार्यक्रमात नाचतांना धक्का लागल्याच्या कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी होवून दंगलीची घटना बुधवारी रात्री तांबापुरा परिसरात घडली. तलवारी, लाठ्या काठ्यांनी मारहाण दगडफेक झाल्याने नागरिकांनी धांदल उडाली होती. घटनेत तलवार तसेच चाकूच्या हल्ल्यात एका गटातील सोनु सुरेश जाधव, युवराज रुपा ठाकरे दोघे रा. तांबापुरा हे गंभीर जखमी झाले असून दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. गुरुवारी सकाळी एमआयडीसी पोलिसांनी अटकसत्र राबविले. यात दोन्ही गटाच्या एकूण जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

भिलवाडा परिसरात देविदास बापू अहिरे यांचे लग्नानिमित्ते हळदीचा कार्यक्रम होता. याठिकाणी नाचण्याचा कार्यक्रम सुरु असतांना धक्का लागल्याच्या कारणावरुन वाद होवून वादाचे रुपांत मारहाणीत व यानंतर दंगलीत झाले. घटनेत दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यात आली. तसेच तलवारी व चाकू तसेच लाठ्या काठ्याचा वापर झाल्याने एकच धावपळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहान, पोलिस निरीक्षक बापू रोहम, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रणजित शिरसाठ, एलसीबी आणि डीबी पथके घटनास्थळावर दाखल झाली. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून ताबडतोब पोलिस बंदोबस्त वाढवला. दगडफेकीत रस्त्यावर दगडांचा खच पडला होता. तो पोलिसांनी बाजूला केला.

दोन्ही गटाच्या परस्पर तक्रारीवरुन गुन्हा
घटनेत शकील शेख चांद यांच्या फिर्यादीवरुन एका गटाच्या प्रकाश ओंकार माळी, रा.जामनेर , कन्हैय्या निंबा ठाकरे, कालु मांगीलाल गोसावी, जितेंद्र हिम्मतसिंग गोसावी, नितीन भगावन मालचे, दिपक प्रकाश पवार, वासु भगावन मालचे, अंबादास बाबु अहीरे, राज हिम्मतसिंग गोसावी, सोनु सुरेश जाधव, रा. तांबापुरा, युवराज रुपा ठाकरे सर्व रा. तांबापुरा यांच्यासह आठ ते दहा जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसर्‍या गटात युवराज ठाकरे याने दिलेल्या फिर्यादीवरुन सदाम खाटीक, शेख महमंद रिजवान अब्दुल रशिद, शेख मो. तौसिफ शेख मो. हनिफ, हनिस शेख अमिनोद्दीन, अरबाज नजीर काकर, अजिज मेहमूद अन्वर, इम्रान खान हमीद खान, शेख अकबर शेख इसाक, शेख आरीफ अब्दुल अजीज, रफिक गजी तांबोळी, अलीद दिलावर काकर, अहेमद मोहम्मद पिंजारी, शकील शेख चांद, अरबाज खान अयुब खान, अल्तमश समसोद्दीन पठाण, काल्या बागवान, सलमान सलीम बागवान, शकील सलिम बागवान, गुलाब शहा मुसा शहा, हसमन शेख शफी, शोएब लतीफ तांबोळी, साहिल मेहमदू निलोभ, रहिम गुलाब शहा, शेख साजीद लिावर काकर, शेख सोहेल जमील, मुनफिल बागवान उर्फ बाबा, मुन्ना सलीम पटेल सर्व रा. बिलाल चौक तांबापुरा यांच्यासह दहा ते जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

दोन्ही गटातील संशयित ताब्यात ; दोघांवर उपचार
पहिल्या गटातील प्रकाश ओंकार माळी, वय 48 रा. नागन चौकी जामनेर , राहुल सुनील सुर्यवंशी वय 24, कन्हैय्या निंबा ठाकरे वय 40, कालु मांगीलाल गोसावी वय 23, जितेंद्र हिम्मतसिंग गोसावी वय 22, नितीन भगावन मालचे वय 28, दिपक प्रकाश पवार, वासु भगावन मालचे वय 23, अंबादास दारा सोनवणे वय 14 , अंबादास बाबु अहिरे वय 32, राज हिम्मतसिंग गोसावी वय 22, सोनु सुरेश जाधव, रा. तांबापुरा, युवराज रुपा ठाकरे सर्व रा. तांबापुरा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असू यापैकी युवराज ठाकरे व सोनु जाधव हे जखमी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

तर दुसर्‍या गटाच्या शेख मोहम्मद रिजवान अब्दुल रशीद, वय 44 , शेख मोहम्मद तौसीफ शेख मोहम्मद हनीफ, वय 27, मोहम्मद अनीस शेख अमीनोद्यीन वय 18 वर्ष, अरबाज नजीर काकर वय 19 वर्ष, अजीज मेहमुद मन्यार वय 48, इम्राण खान हमीद खान, वय 32, रफिक गनी तांबोळी 45 आबीद दिलावर काकर वय 34, मेहमुद मोहम्मद पिंजारी वय 28 , शकील शेख चांद, वय 35 सर्व तांबापुरा, अल्तमश समासोद्यीन पठाण, वय 18 वर्ष, रा. दत्त नगर, मेहरुण, शेख अकबर शेख इसाक, वय 20 वर्ष, रा. आझादनगर, मेहरुण, जळगाव 08) शेख आरीफ अब्दुल अजीज वय 18 रा. आझाद नगर, मेहरुण, या 13 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Exit mobile version