Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तहसील आवारातून ट्रक पळविला

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तहसील कार्यालयात खडीने भरलेला जप्त केलेला ट्रक परवानगी न घेता चोरून नेल्याचे समोर आले आहे. याबाबत भुसावळ शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तहसील कार्यालयाच्या आवारात (एमएच ०१ झेड ६३६३) हा ट्रक अवैधरित्या खडी भरून वाहतूक करत असताना भुसावळ महसूल विभागाने कारवाई करत ट्रक जप्त करून भुसावळ तहसील कार्यालयात लावण्यात आला होता. दरम्यान २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ ते २१ नोव्हेंबर सकाळी १० वाजता दरम्यान तहसील कार्यालयात लावलेला ट्रक संशयित आरोपी मनोज सुरेश भागवत रा. साकेगाव ता. भुसावळ याने तहसील कार्यालयातून चोरून घेऊन गेला. या संदर्भात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात मनोज भागवत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शशिकांत पाटील करीत आहे.

Exit mobile version