Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तळेगाव वाडी येथील पाझर तलावात पाच चिमुकलींचा बुडून मृत्यू

जालना वृत्तसंस्था । तालुक्यातील तळेगाव वाडी येथे पाच ते सात वर्षांच्या पाच मुलींचा पाझर तलावात खेळताखेळता बुडून मृत्यू झाल्याची भयंकर घटना मंगळवारी घडली.

मृतांची नावे
शब्बूबी अस्लम पठाण (वय ५), आशुबी लतीफ पठाण (वय ६), नबिबाबी नवाज पठाण (वय ६), सानियाबी अस्लम पठाण वय (वय ६), अल्फिदाबी गौसखा पठाण (वय ७) यांचा समावेश आहे. तळेगावच्या शिवारात तळेगाव वाडी म्हणून एक शेतवस्ती आहे. या वस्तीला लागून गट क्रमांक ४५६मध्ये एक पाझर तलाव आहे. या तलावाच्या परिसरात पाच ते सात वयोगट असलेल्या पाच मुली खेळत होत्या. खेळताखेळता या पाचही मुली तलावात बुडाल्या. तलावात पावसाने बऱ्यापैकी पाणी झाल्यामुळे येथे त्यांचा श्वास गुदमरून अंत झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी पाचही मुलींना उपचारासाठी फुलंब्री येथे आणले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. संबंधित मुलींना भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Exit mobile version