Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तळीरामांनी चक्क राज्य उत्पादन शुल्क विभागाचे गोदाम फोडून दारू पळवली

नाशिक (वृत्तसंस्था) नाशिकमधील तळीरामांनी चक्क राज्य उत्पादन शुल्क विभागाचे गोदाम फोडून तीन लाख रुपये किंमतीची दारू पळवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

शहरातील आरती चौकातील राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केलेल्या मालखान्यावर चोरट्यांनी डल्ला मारला. रात्री चोरट्यांनी मालखान्यातून दारु लंपास करुन थेट पोलिसांनाच आव्हान दिले. या चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी या चोरट्यांना मुद्देमालासह अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम हाती घेऊन दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

Exit mobile version