Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तळवेल येथून अल्पवयीन मुलाला फूस लावून पळविले

भुसावळ -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ! भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील सोळा वर्षी अल्पवयीन मुलाला अज्ञात व्यक्तीने फूस लावून लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत वरणगाव पोलीस ठाण्यात सोमवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील तळवेल गावात पियुष सारंग पाटील (वय-१७) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ३० डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता घरी असताना पियुषला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. त्याच्या नातेवाईकांनी त्याच्या सर्वत्र शोध घेतला, परंतु तो कुठेही मिळून न आल्याने अखेर वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तिविरोधात फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी करीत आहे.

 

Exit mobile version