Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या एकाला अटक

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील जुना पारधीवाडा भागात राहणारा तरूण हा हातात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपीला अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहितीशी की, अमळनेर शहरातील जुना पारधीवाडा भागात राहणारा राजू उर्फ दादू एकनाथ निकुंभ हा शहरातील सुभाष चौक भागांमध्ये धारदार तलवार घेऊन दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती अमळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोलीस हेड कॉन्स्टेबल कपिलदेव पाटील, पोलीस नाईक मिलिंद भामरे, लक्ष्मीकांत शिंपी, सूर्यकांत साळुंखे यांनी बुधवार ७ डिसेंबर रोजी दुपारी कारवाई करत संशयित आरोपी राजेश उर्फ दादू एकनाथ निकम याला पटेल कॉम्प्लेक्स जवळील गल्लीतून ताब्यात घेतले आहे. त्याच्या जवळील तलवार हस्तगत करण्यात आले आहे. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी राजेश उर्फ दादू एकनाथ निकम याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार रामकृष्ण कुमावत करीत आहे.

Exit mobile version