Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तलवारासह दोन जणांना सिंधी कॉलनीतून अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावशहरातील सिंधी कॉलनी परिसरातील कंवर नगर पोलीस चौक परिसरातून हातात तलवार घेवून दहशत निर्माण करण्याऱ्या दोन जणांना एमआयडीसी पोलीसांनी शनिवारी २० मे रोजी रात्री अटक केली. यातील एक संशयित आरोपी हा एक वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार आहे. याबाबत रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अधिक माहिती अशी की, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कंवर नगर पोलीस चौक परिसरात हद्दपार असलेल्या आरोपीसह एकजण हे दोनजण दुचाकीवर बसून  हातात तलवार घेवून दहशत निर्माण करत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने संशयित आरोपी  जुनेद शेख उर्फ बवाली युनूस शेख (वय २६,रा. बिलाल चौक, तांबापुरा) , रहीम शेख सलीम (वय २८, रा. मास्टर कॉलनी, जळगाव)  या दोघांना ताब्यात घेतले.  यातील जुनेद शेख हा जळगाव जिल्ह्यातून एक वर्षाकरिता हद्दपार आहे. तो सिंधी कॉलनी रस्त्यावरील कंवरनगर पोलीस चौकी परिसरात २० मे रोजी  मिळून आला. त्याच्याकडून लोखंडी लहान तलवार हस्तगत केली आहे.  रहीम शेख यांचेकडे कमरेला लोखंडी लहान तलवार मिळून आली आहे.  पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर भालेराव यांचे फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना सचिन मुंढे करीत आहेत.

Exit mobile version