Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

…तर १४ एप्रिल नंतरही काही ठिकाणी लॉकडाऊन ?

modi 1

नवी दिल्ली । १४ एप्रिलला लॉकडाऊन संपणार असले तरी या नंतरही काही ठिकाणी मर्यादीत प्रमाणात लॉकडाऊन सुरू राहू शकते अशी माहिती आता समोर आली आहे.

कोरोना व्हायरसचा संसर्ग मर्यादीत प्रमाणात रहावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला असून तो १४ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र हा लॉकडाऊन एकाच वेळेस पूर्णपणे न उठविता याला टप्प्याटप्प्याने उठविण्याची शक्यता आहे. एकाच वेळी सगळीकडे लॉकडाउन उठवण्यापेक्षा ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करोना व्हायरसचे रुग्ण आहेत तेथे मर्यादित स्वरूपात लॉकडाउन सुरू ठेवण्याचा विचार सरकार करत आहे. या संदर्भात इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वर्तमानपत्राने वृत्त दिले आहे.

या वृत्तात नमूद करण्यात आलेल्या अधिकार्‍याचे म्हणणे आहे की, ज्या ठिकाणी रुग्णांची संख्या अधिक आहे किंवा ती वाढण्याची भीती आहे अशा काही ठिकाणांची यादी तयार करू शकलो तर पुढे काय निर्णय घ्यायचा हे सोपं होईल. असे शकडो ठिकाणं असू शकतात. उर्वरित भागात काही चिंतेची बाब नाही, असे आम्हाला दिसले तर तेथील लॉकडाउन पूर्णपणे काढला जाऊ शकतो. तेथील जनजीवन सुरळीत होऊ शकतं. ज्या भागांमध्ये करोनाची भीती कायम असेल तेथे मात्र काही प्रमाणा किंवा मर्यादित स्वरूपात लॉकडाउन कायम ठेवला जाऊ शकतो. परिणामी, जिथे धोका अधिक आहे तेथेच जास्त लक्ष केंद्रित करता येणार आहे. यामुळे आता लॉकडाऊन हे टप्प्याटप्प्याने उडविण्यात येणार असल्याची शक्यता बळावली आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Exit mobile version