Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तर मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही –आ. भोळे (व्हिडिओ)

 

जळगाव,प्रतिनिधी। भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा व महानगरतर्फे टॉवर चौकात राज्य सरकारच्या विज बिल धोरणाच्या निषेधार्थ विज बिलाची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला. लाईट बिल जोपर्यंत कमी किंवा माफ केले जात नाही तोपर्यंत कोणत्याही मंत्र्यास रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा आ. राजूमाम भोळे यांनी दिला.

महाविकास आघाडी सरकारने भरमसाठ वीजबिलांबाबत सरकारने रास्त सवलत द्यावी या मागणीसाठी आज भारतीय जनता पार्टीतर्फे टॉवर चौकात वीज बिलांची होळी करून आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या वसंत स्मृती कार्यालयापासून ते टॉवर चौकपर्यंत मोर्चा काढण्यात आला. यानंतर चौकात लाईट बिलांची होळी करून राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा आ. राजूमामा भोळे यांनी आंदोलनाबाबत आपली भूमिका मांडतांना सांगितले की, आघाडी सरकाने जनतेची दिशाभूल केली आहे. या सरकाने जनतेला बिल माफ करू, कमी करू असे आश्वासन दिले होते परंतु ते पूर्ण केले नाही. सर्वसामान्य जनता ही बिले भरू शकत नाही. बिल न भरल्याने एमएसइबी लाईट कनेक्शन कट करत आहे. भाजपा सरकारने जनतेला लाईट बिलासाठी कधीच वेठीस धारले नाही मात्र हे आघाडी सरकार जनतेस विठीस धरत असून आम्ही याचा जाहीर निषेध करत असून लाईट बिल जोपर्यंत कमी किंवा माफ केले जात नाही तोपर्यंत कोणत्याही मंत्र्यास रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा आ. राजूमाम भोळे यांनी दिला.

याप्रसंगी महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर भारती सोनवणे, भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष उज्वला बेंडाळे, उपमहापौर सुनिल खडके, महिला व बालकल्याण समिती सभापती रंजना सपकाळे, चेतन सनकत, डॉ. अश्विन सोनवणे, कैलास सोनवणे, अॅड. शुचिता हाडा, विशाल त्रिपाठी, कैलास सोनवणे, अॅड.दिलीप पोकळे, नवनाथ दारकुंडे, जितेंद्र मराठे, अमित काळे, दीप्ती चिरमाडे, डॉ. राधेश्याम चौधरी, पिंटू काळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version