Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

……तर भाजपवर बचाव आंदोलनाची वेळ आली नसती-गुलाबराव वाघ

धरणगाव प्रतिनिधी । भाजपने कंटेनमेंट झोनमधील नागरिकांना मदत केली असती तर त्यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ आली नसते असा टोला मारत शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. ते रोग प्रतिकारक गोळ्यांचे वाटप केल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.

शुक्रवारी भाजपने राज्य सरकारच्या विरोधात माझे अंगण…माझे रणांगण या संकल्पनेच्या अंतर्गत राज्यव्यापी आंदोलन केले. शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी याचा जोरदार समाचार घेतला. धरणगाव येथे कंटेन्मेंट झोन मध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आदेशानुसार धरणगाव नवेगाव परिसरात घरोघरी जाऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढविणार्‍या आर्सेनिक अल्बम-३० या गोळ्यांचे वाटप करतांना पत्रकारांशी बोलतांना श्री वाघ म्हणाले की, कोरोना चा हाहाकार असून महाराष्ट्रात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे या युध्दजन्य स्थितीत समयसूचकता ठेवून परिस्थिती हाताळत आहेत. कंटेनमेंट झोनधील नागरिकांना भाजपाने मदत केली असती तर आंदोलनाची वेळ आली नसती असा टोला मारला. दरम्यान, रोगप्रतिकारक शक्तीचा(असैनिक अल्बम-३० ) या गोळ्या नवेगाव परिसरात वाटण्यात आल्या. यावेळी शासनाच्या आदेशानुसार शिवसैनिक नि सोशल डिस्टनशिग चे पालन करून कलम १४४चे पालन करत नागरिकांना गोळ्यां विषयी माहिती देण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे , विभाग प्रमुख संजय चौधरी, नगरसेवक विलास महाजन दगडू चौधरी उपस्थित होते.

दरम्यान, याप्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी म्हणाले की, विरोधकांनी सोशल मीडियावर टीका करण्यापेक्षा जनतेचा मदतीला रस्त्यावर यावे. तसेच आयसोलेशन विभागात सर्व सोयी उपलब्ध असून टीकाकरणी स्वतः पाहणी करून च टीका करावी तसेच कँटेन्मेंट झोन मधील नागरिकांना अडचण असल्यास नगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे.

तर शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र महाजन यांनी देखील भाजपच्या आंदोलनावर टीका केली. ते म्हणाले की, शुक्रवारी शहरात दोन कारणे झाली असून एका राजकीय पक्षाने केले राजकारण तर एका पक्षाने केले समाजकारण नागरिकांनी विचार करावा.

Exit mobile version