Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

…तर न्याय न मिळाल्यास फाशी घेणार; गाडेगाव येथील महिलेचा इशारा

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील गाडेगाव येथील महिलेला मंजूर झालेले घरकुल योजनेचे काम सरपंच आणि ग्रामसेवक यांनी होवू दिले नाही. आपल्याला न्याय मिळावा यासाठी  पंचायत राज समितीच्या त्रिसदस्यीय समितीने आज जामनेर पंचायत समितीला भेट दिली. त्यावेळी त्यांनी भेट घेवून आपली समस्या मांडली. न्याय न मिळाल्यास फाशी घेणार आसल्याचा इशारा संबंधित महिलेने दिला आहे.

जिल्ह्यात आलेल्या पंचायत राज समितीच्या त्रिसदस्यीय समितीने आज जामनेर पंचायत समितीला भेट दिली. यावेळी तालुक्यातील गाडेगाव येथील महिला सुनंदा सुरेश सपकाळे या महिलेने समितीतील सदस्यांची भेट आपली कैफियत मांडली. सुनंदा सपकाळे ह्या गाडेगाव ग्रा.पं.च्या माजी सदस्या आहेत. त्यावेळी त्यांना ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार व गैरव्यवहाराविरोधात आवाज उठविला होता. या कारणामुळे वैयक्तीक द्वेषातुन त्यांचे मंजूर असलेले घरकुल योजनेचे काम होवू दिले नाही. आपल्याला न्याय न मिळाल्यास फाशी घेणार असल्याचा इशारा दिला आहे. त्रिसदस्यीय समितीत अध्यक्ष म्हणून विधान परिषद सदस्य अमरनाथ राजुरकर, विधान परिषद सदस्य अंबादास दानवे, विधानसभा सदस्य प्रदीप जैस्वाल यांनी संबधीत विभागाची गोपनीय चौकशी केली.

पत्रकार व प्रसिद्धी माध्यमाना यावेळी बाहेर ठेवण्यात आले. मात्र यावेळी पत्रकारांनी आम्हाला काही प्रश्न विचारायचे आहे म्हटल्यावर तुम्हाला काही वेळा माहिती देण्यात येईल असे सांगितले.  शेवटी समिती निघतांना पत्रकारांनी सिंचन विहिरी व हागणदारीमुक्त योजनेची तालुक्यात काय परिस्थिती आहे. याबाबतीत आपण काय उपाययोजना करणार किंवा काय संबधीत विभागाबद्दल काय कारवाई केली जाईल. याविषयी विचारले असता. विषयाला बगल देत ही समस्या सर्वदुर आहे असे उत्तर देत. तुम्ही रितसर तक्रार द्या, कारवाई करू असे दानवे यांनी सांगितले बदं दारामागे समिती चौकशी करणार होती तर एवढा तामछाम का व कशासाठी अशी चर्चा जामनेरकर करीत आहे.

Exit mobile version