Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तरूणीवर अत्याचार करणाऱ्या दोघांना सश्रम कारवासाची शिक्षा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फिरायला घेवून जाण्याचा बहाणा करून एका शेतात नेवून तिच्यावर सामूहिक अत्याचार करणाऱ्या दोघांना जळगाव जिल्हा न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी ४५ हजाराची दंडाची शिक्षा सुनावली आहे.

 

जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरूणी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २४ नोव्हेंबर २०१९ रोजी गणेश कमलाकर सुर्वे (वय-२०) आणि प्रकाश सुरेश नागपुरे (वय-२२) दोन्ही रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव यांनी तरूणीला रिक्षात बसवून निर्जळ ठिकाणी नेत तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात येवून अटक करण्यात आली होती. या प्रकारणाचा खटला जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्या. बी.एस.महाजन यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. या खटल्यात एकुण १४ साक्षिदार तपासण्यात आले. यात पिडीता व डॉक्टरांची साक्ष महत्वाची ठरली. त्यानुसार गणेश कमलाकर सुर्वे आणि प्रकाश सुरेश नागपूरे यांना दोषी ठरविण्यात आले. न्यायालयाने विविध कलमान्वये दोघांना २० वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी ४५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला. सरकारपक्षातर्फे सरकारी वकील ॲड. चारूलता बोरसे यांनी काम पाहिले.

Exit mobile version