Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तरूणीची गळफास घेवून आत्महत्या

भडगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील वडगाव येथील २२ वर्षीय तरूणीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

 

सोनी उर्फ सविता किरण राठोड (वय-२२) रा. वडगाव नालबंदी ता. भडगाव जि.जळगाव असे गळफास घेतलेल्या तरूणीचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की,  सोनी राठोड ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ५ एप्रिल रोजी घरी कुणीही नसतांना सोनी राठोड हिने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दुपारी उघडकीला आली आहे. सायंकाळी तिचे कुटुंबिय घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. शेजारचांच्या मदतीने तिला भडगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे कारण नेमके कळू शकले नाही. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version