Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तरूणाला शिवीगाळ करत लोखंडी पट्टीने मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गोलाणी मार्केट परिसरात खिसे चेक करण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका हमाली काम करणाऱ्या तरूणाला शिवीगाळ करत लोखंडी पट्टीने मारहाण करून दुखापत केल्याची घटना शनिवारी २४ जून रोजी रात्री १ वाजता घडली. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मण श्रावणक भारूडे (वय-२८) रा. सम्राट कॉलनी, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. हमालीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. शनिवारी २४ जून रोजी रात्री १ वोच्या सुमारास लक्ष्मण हा शहरातील गोलाणी मार्केट परिसरातील संजय फुल भांडार येथे झोपलेला असतांना मल्हार उर्फ काल्या हिरामण वाघ हा आला. त्याने लक्ष्मण यांच्या खिश्यात हात घातला तेवढ्यात लक्ष्मणला जाग आली. त्याने याला विरोध केला असता मल्हार वाघ याने शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच त्यांच्या हातातील लोखंडी पट्टीने मारहाण केल्याने मानेवर व कानावर दुखापत झाली. याप्रकरणी लक्ष्मण भारूडे याने दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी मल्हार उर्फ काल्या हिरामण वाघ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दिलीप पाटील करीत आहे.

Exit mobile version