Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तरूणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चालतांना धक्का लागल्याने तरूणावर विट फेकून मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहित भिकन शिरसाठ (वय-२१) रा. अण्णाभाऊ साठे नगर, स्टेशन रोड, चाळीसगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजूरी करून आपला उदरनिर्वाह करतो. १८ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास रोहित हा त्याच्या घराजवळून जात असतांना नंदू भास्कर शिरसाठ याला चालतांना धक्का दाखला. याचा राग आल्याने नंदू शिरसाठ आणि बजरंग नंदू शिरसाठ या दोन्ही भावांनी रोहित याला लोखंडी रॉडने डोक्यावर मारहाण केली तर दुसऱ्याने तोंडावर विट फेकून मारली. यात रोहित हा जखमी झाला. त्याला ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्याच्या जबाबावरून संशयित आरोपी नंदू भास्कर शिरसाठ आणि बजरंग नंदू शिरसाठ दोन्ही रा. अण्णाभाऊ साठे नगर, चाळीसगाव यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किशोर सोनवणे करीत आहे.

Exit mobile version