Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तरूणाला मारहाण करून मोबाईल लांबविला

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुकानावर जात असलेल्या मुलाला मारहाण करून जबरी मोबाईल हिसकावून चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात दाने जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अधिक माहिती अशी की, प्रभाकर नथ्थू पाटील (वय-७०) रा. श्रध्दा नगर, अमळनेर हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्याचा मुलगा  २१ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास दुकानावर पायी जात असतांना संशयित आरोपी जाफरखा शफिखा येवती (वय-२२) आणि मुस्तफा उर्फ अफजल अमहमद शेख (वय-२२) दोन्ही रा. कसाई मोहल्ला, अमळनेर यांनी रस्ता आडवून त्याला मारहाण केली. यात त्याच्या खिश्यातील १० हजाराचा मोबाईल जबरी हिसकावून लंपास केला. यासंदर्भात प्रभाकर पाटील यांनी अमळनेर शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात जाफरखा शफिखा येवती (वय-२२) आणि मुस्तफा उर्फ अफजल अमहमद शेख (वय-२२) दोन्ही रा. कसाई मोहल्ला, अमळनेर  यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल हटकर करीत आहे.

Exit mobile version