Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तरूणाला मारहाण करण्याची धमकी देणाऱ्या तिघांना अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नेरीनाका स्मशानभूमीजवळ जुन्या वादातून एका तरुणाचा रस्ता अडवून शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी देणाऱ्या करणाऱ्या तीन संशयित आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी १२ डिसेंबर रोजी रात्री जैनाबाद येथून अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील नेरीनाका स्मशानभूमीजवळ आकाश सुखलाल ठाकूर (वय-२२) रा. तुकारामवाडी हा तरुण रविवारी ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्याचा मित्र पवन दिलीप बाविस्कर व गजानन राजेंद्र पारे असे उभे होते. यावेळी जुन्या भांडणाच्या कारणावरून पियुष उर्फ वाघ्या मुकुंदा ठाकूर (वय-२०) रा.तुकारामवाडी, कुणाल उर्फ दुंड्या किरण कोळी (वय-१८) रा. कुसुंबा ता.जि. जळगाव, रोहित उर्फ भाल्या उत्तम भालेराव (वय-२३) रा. तुकारामवाडी आणि स्वप्निल उर्फ गोली धर्मराज ठाकूर रा.ज्ञानदेव नगर, जळगाव या चौघांनी आकाश ठाकूर याचा रस्ता अडून त्याला अश्लिल शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिली होती. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर चौघे आरोपी हे फरार होते. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील, पोलीस नाईक किशोर पाटील, छगन तायडे, मुकेश पाटील, सचिन पाटील यांनी कारवाई करत संशयित आरोपी पियुष ठाकूर, रोहित भालेराव, आणि कुणाल कोळी या तीन जणांना सोमवारी १२ डिसेंबर रोजी रात्री जैनाबाद येथून अटक केली आहे.

Exit mobile version