तरूणाला बेदम मारहाण; दुचाकीचेही नुकसान

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पेट्रोल संपल्यामुळे दुचाकी ढकलत घेवून जाणार्‍या तरुणाला लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण करीत गंभीर जखमी केल्याची घटना घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील कोळी पेठेतील कोल्हे गोडाऊन जवळील जगदिश सुकलाल भोई हा तरुण त्याच्याकडे असलेल्या (एमएच १९ डीएल ७९६०) क्रमांकाच्या दुचाकीने सागर पाटील या त्याच्या मित्रसोबत जात होता. त्याच्या दुचाकीचे पेट्रोल संपल्यामुळे जगदिश व त्याचा मित्र सागर राजू पाटील हे दोघ दुचाकी लोटत घेवून जात होते. यावेळी आठ ते दहा इसमांनी हातात लाठी काठी व कोयते घेवून गैरकायद्याची मंडळी जमवून दहशत माजवित होते. यावेळी सागर पाटील याला त्या इसमांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यात सागरच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्याच्या दुचाकीवर मोठमोठे दगड टाकून नुकसान केले आहेत. याप्रकरणी जगदिश भोई याने दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीसात ८ ते १० अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास योगेश सपकाळे हे करीत आहे.03:41 PM

Protected Content