तरूणाच्या हातातील मोबाईल धुमस्टाईल लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील हॉटेल कमल पॅराटाईज समोरील रोडवर मोबाईलवर बोलत असतांना तरूणाच्या हातातील १३ हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात दोन जणांनी धुमस्टाईल लांबविल्याची घटना घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवारी २३ मे रोजी दुपारी ३ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, जयेश प्रकाश राणे (वय-१८) रा. म्हैसवाडी ता. मलकापूर जि. बुलढाणा हा तरूण जळगाव शहरात शिक्षण घेत आहे. ११ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जयेश हा जळगाव भुसावळ रोडवरील हॉटेल कमल पॅराटाईज समोरील रोडवरून मोबाईलवर बोलत पायी जात होता. त्यावेळी त्याच्या मागून दोन अज्ञात चोरटे दुचाकीने येवून त्यांच्या हातातील १३ हजार रूपये किंमतीचा मोबाइ्रल जबरी हिसकावला व दुचाकीने पसार झाले. या घटनंतर जयेश राणे हा प्रचंड भेदरला होता. त्यामुळे त्यांनी ही घटना कुणालाही सांगितली नाही. अखेर मंगळवारी २३ मे रोजी त्याने घडलेली घटना वडीलांना सांगितली. त्यानुसार मंगळवारी २३ मे रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील करीत आहे.

Protected Content