Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तरूणाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील पंडीतराव कॉलनी परिसरातून तरूणाची ५५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी १७ जानेवारी रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, सागर मैजीराव नवघरे (वय-२८) रा. फरदापूर ता. सोयगाव जि. औरंगाबाद हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सागर नवघरे हा कामाच्या निमित्ताने १६ जानेवारी रोजी जळगाव शहरातील पंडीतराव कॉलनी येथे नातेवाईकांकडून दुचाकी (एमएच २० एफटी २५४७) ने आलेला होता. रात्री १० वाजता नातेवाईकाच्या घरासमोर दुचाकी पार्क करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ५५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे मंगळवारी १७ जानेवारी रोजी सकाळी उघडकीला आली. त्याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायंकाळी ६ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विजय खैरे करीत आहे.

Exit mobile version