Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तरूणाचा मोबाईल चोरट्यांनी लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शाम नगर येथून तरुणाचा १० हजार रुपयांचा मोबाईल लांबविल्याची झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, श्याम नगर येथे सुनिल तुकाराम गजाकुश वय ३४ हे राहतात. 15 मे रोजी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास त्यांचा दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरीस गेल्याचे समोर आले. याप्रकरणी सुनील गजाकुश यांनी मंगळवारी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल संजय सपकाळे करीत आहेत.04:14 PM

Exit mobile version