Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तरूणांनी उद्योग व्यवसायात संधी मिळवुन संधीचे सोने करावे : अतुल पाटील

यावल, प्रतिनिधी | तरुणांनी नोकरी मागे न लागता उद्योगधंद्यात व्यवसायात खूप चांगली संधी असून या संधीचा सोने करावे असे आवाहन नगरसेवक गटनेते तथा बाजार समितीचे संचालक अतुल पाटील यांनी केले. ते मराठा महासंघाच्या वतीने आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

 

मराठा महासंघाच्या वतीने आयोजित बैठकीप्रसंगी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. मनोज पाटील, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष तथा आशीर्वाद फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अजय पाटील मराठा महासंघाचे जिल्हा सरचिटणीस दीपक राज पाटील उपस्थित होते. यावेळी प्रा. मनोज पाटील यांनी उपस्थित समाजबांधवांना मराठा महासंघाचे ध्येयधोरणे आणि भविष्यातील वाटचाल कशी राहील व संघटन वाढवण्यासाठी काय करावे लागेल या संदर्भातील मार्गदर्शन केले. प्रा. अजय पाटील यांनी मराठा समाजातील लग्न संस्कार या संदर्भात मार्गदर्शन करताना लग्न साध्या पद्धतीने करण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा व होणारा खर्च कमी करावा असे आवाहन केले. सूत्रसंचालन अॅड. देवकांत पाटील यांनी केले. प्रास्ताविक दीपक राज पाटील यांनी केले. आभार मयुर पाटील यांनी मानले. या बैठकीत मराठा महासंघाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यात यावल शहराध्यक्ष म्हणून भूषण खैरे यांची तर वृषाली पाटील यांची तालुका कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या शिवाय लखन पवार, मयुर पाटील, स्वप्नील कोणते, रणधीर पाटील, आशुतोष पाटील, गोपाल कोणते, विजय इंगळे, भूषण अहिरे, निलेश भोईटे, रितेश पाटील, आकाश जाधव, चेतन पाटील, राकेश शिर्के आदींना कार्यकारिणीत स्थान देण्यात आले.

Exit mobile version