Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तरुणीला बदनामीची धमकी दिल्याने एकावर गुन्हा दाखल

 

शेंदूर्णी प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या लिहा ता. जामनेर येथील अतुल उर्फ बबलू राजाराम चव्हाण (वय २५) या युवका विरोधात बदनामी व धमकी दिल्या प्रकरणी पहुर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या विषयी सविस्तर माहिती घेतली असता फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार बबलू चव्हाण याने फिर्यादीचे मुलीची बदनामी करून अशी धमकी दिली होती. बबलू चव्हाण विरोधात फिर्याद नोंदविण्यात आल्याने त्याच्यावर गु.र. नंबर १४/२०२१ भा.दं.वी.५००,५०६ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पो. ना.किरण शिंपी शेंदूर्णी दुरक्षेत्र हे करत आहेत.

Exit mobile version