Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तरुणास आईसक्रीम विक्रेत्याकडून मारहाण

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आईसक्रीम मागण्याच्या कारणावरून तरूणाला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना अजिंठा चौकात घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, गणेश भगवान लोहार (वय-२४) रा. राका चौक, एमआयडीसी हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २२ एप्रिल रोजी गणेश हा अजिंठा चौकात आईसक्रीम घेण्यासाठी गेला होता. आईसक्रीम दुकानावरील शिवा पुरभीया याला लवकर आईसक्रीम दे असे सांगितल्याचा राग आल्याने शिवा पुरभीया, गोविंद शिवा पुरभीया आणि रामुलाल पुरभीया सर्व रा. अजिंठा चौफुली जळगाव यांनी हातात लाकडी दांडा व फायटरने गणेशला बेदम मारहाण केली. याप्रकरणी गणेश लोहार यांनी रविवारी २४ एप्रिल रोजी रात्री संशयित आरोपी शिवा पुरभिया, गोविंद पुरभीया आणि रामलाल पुरभीया या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील करीत आहे.

Exit mobile version