Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तरुणाला मारहाण करत सलून दुकानातील काचा फोडल्या

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आझाद नगर भागात जुन्या भांडणाच्या कारणावरुन तरुणाला मारहाण करत त्याचे सलून दुकानाच्या काचा फोडून नुकसान केल्याची घटना रविवार, ५ फेब्रुवारी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात एका जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील आशाबाबा नगरात कैलास राजेंद्र निकम वय २७ हा तरुण राहतो. त्याचे आझाद नगर भागात सलूनचे दुकान आहे. कैलास हा रविवारी दुकानावर असतांना रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास शाहरुख पिंजारी हा आला. त्याने दारुच्या नशेत जुन्या भांडणाच्या कारणावरुन कैलास यास चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. यादरम्यान शाहरुख याने कैलास याच्या दुकानातील काचा फोडून नुकसान केले या प्रकरणी कैलास निकम याने दिलेल्या तक्रारीवरुन शाहरुख पिंजारी रा. आझादनगर याच्याविरुध्द अदखलपात्र गुन्ह्याची नोदं करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय सपकाळे हे करीत आहे.

Exit mobile version