Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तरुणाने उचलला टोकाचा निर्णय; कारण अस्पष्ट

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील थोरगव्हाण गावातील राहणाऱ्या एका तरुणाने आपल्या शेतात गळफास घेवुन आत्महत्या करून आपली जिवनयात्रा संपवल्याची घटना घडली. यावल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

 

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, अतुल ईश्वर पाटील (बेदारे) (वय-२८) रा. थोरगव्हाण तालुका यावल यांनी २० जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास थोरगव्हाण शिवारातील आपल्या शेतातील बांदावर असलेल्या झाडास ठिंबक नळीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. अतुल ईश्वर पाटील (बेदारे) यांने आत्महत्या का केली. हे मात्र स्पष्ट होवु शकले नाही. यावलच्या ग्रामीण रुग्णालयात अतुल ईश्वर पाटीलच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

 

भारत चावदस पाटील यांनी खबर दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.आत्महत्या केलेल्या तरूणास आई, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे.

Exit mobile version