Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तरुणाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे गोण्यांमध्ये भरून नदीपात्रात फेकले

अहमदनगर (वृत्तसंस्था) तरुणाची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे गोण्यांमध्ये भरून नदीपात्रात फेकल्याची खळबळजनक घटना अकोले तालुक्यात उघडकीस आली आहे.

 

 

वाकी शिवारातून वाहत असलेल्या कृष्णावंती नदीवर असणाऱ्या पुलाच्या खाली दोन गोण्या आढळून आल्या. त्यातून दुर्गंधी येत असल्याने परिसरातील नागरिकांनी याबाबतची माहिती राजूर पोलीस ठाण्यात कळवली. पोलिसांच्या पथकाने त्या गोण्या उघडून पाहिल्यानंतर शरीराचे तुकडे असल्याचे दिसले. २० ते २५ वयोगटातील तरुणाच्या शरीराचे तुकडे असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. पाच ते सहा दिवसांपूर्वीच या गोण्या याठिकाणी फेकल्या असाव्यात असा कयास आहे. मृत तरुणाची ओळख पटवण्यात येत आहे.

Exit mobile version