Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

…तरच जिल्हा कोरोनामुक्त होईल-एनएसयुआयचा दावा

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनात माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांचे ‘सेवेकरी’ कार्यरत असल्याचा सनसनाटी आरोप करून त्यांना तात्काळ बदलले तरच जिल्हा कोरोनामुक्त होईल असा दावा एनएसयुआयने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आज जिल्हा दौर्‍यावर होते. याप्रसंगी विश्रामगृहात एसएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी आपल्या सहकार्‍यांसह त्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यातील कोरोना ची परिस्थिती अतिशय भयावह झालेली असताना जिल्ह्याचे मृत्यूचे प्रमाण देखील देशांमध्ये हे सर्वाधिक असल्याचे आढळून आलेले आहे
परंतु कधीकाळी ग्रीन झोन मध्ये असलेला जळगाव जिल्हा अचानक इतक्या रेडझोन च्या अतिगंभीर परिस्थितीमध्ये कसा गेला??
संपूर्ण जिल्हाभरातून सर्व नागरिकांची एकच ओरड सुरू असताना देखील प्रशासन हेतुपुरस्कर जिल्ह्याच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले आहे
जिल्ह्याचे सर्व प्रशासकीय प्रमुख म्हणजेच जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक व कोविड रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर खैरे हे प्रमुख लोक मात्र जनतेची सेवा न करता माजी मंत्री गिरीश महाजन यांची सेवा करत व यांचे आदेश पाळत हेतुपुरस्कर जिल्ह्याची परिस्थिती हाताबाहेर जाण्याची वाट बघत आहे.
१०५ आमदार निवडून येऊन देखील सत्य बाहेर राहावं लागत असल्याच्या रागा पोटी माजी मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा विसरून गेले की आपण जळगाव जिल्ह्याचे नागरिक आहोत. परंतु सत्तेच्या लालसेपोटी व राजकारण करण्याच्या हेतू पोटी जिल्ह्याच्या नागरिकांच्या जीवाशी खेळत प्रशासकीय अधिकार्‍यांवर दबाव टाकत जिल्ह्याची परिस्थिती मुद्दाम हाताबाहेर जाऊ देण्याचं कटकारस्थान करत असल्याचे दिसून आले आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, माजी मंत्री जरी आपल्या पक्षाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील नागरिकांच्या जीवाशी खेळत प्रशासनाला हाताशी धरून महा विकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचे काम करीत असले तरी उच्चशिक्षित असलेले प्रशासनाचे प्रमुख यांना मात्र अजूनही विसर पडलेला आहे की राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही आहे. व त्यामुळे आपण भाजपाच्या माजी मंत्र्याचे न ऐकता राज्याच्या महा विकास आघाडी सरकारच्या मंत्र्याचे ऐकले पाहिजे परंतु जिल्ह्याच्या प्रशासन प्रमुखांवर अजूनही भाजपाचेच भूत असल्याचे दिसून येत आहे.

आज जिल्ह्याच्या दौर्‍यावर महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री येत असल्यामुळे जिल्हाधिकारी व प्रशासनाने आपल्या भोंगळ कारभाराला लपविण्यासाठी ऐनवेळी जिल्हा परिषद सीईओ बी. एन. पाटील यांची कोविड रुग्णालयाच्या प्रशासक अधिकारी पदी नेमणूक केली. त्यामुळे जळगाव जिल्हा एनएसयूआयच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी आरोग्य मंत्र्याकडे या सर्व प्रकाराची माहिती देत मागणी केली कि की आपण जिल्ह्यातील या माजी मंत्र्याच्या सेवेकर्‍यांना पदावरून तात्काळ हटवले तरच खर्‍या अर्थाने जळगाव जिल्हा कोरोना मुक्त होईल. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे व युवक कांग्रेस शहराध्यक्ष मुजीब पटेल आदी उपस्थित होते.

Exit mobile version