Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तन्वी वाघचा झांबरे विद्यालयात सत्कार

जळगाव प्रतिनिधी । ए.टी.झांबरे विद्यालयाची १० वीची विद्यार्थीनी तन्वी मनोज वाघ हिचा युनो इन्फॉर्मेशन सेंटरकडून गुणवत्ता प्रमाणपत्र मिळवल्याबद्दल शाळेत सत्कार करण्यात आला.

याबाबत वृत्त असे की, श्री.रामचंद्र मिशन,युनायटेड नॅशन्स इन्फॉर्मेशन सेंटर आणि द हार्टफुलनेस एज्युकेशन ट्रस्ट यांच्या वतीने राष्ट्रीयस्तरावरील (८ वी ते १२ वी) गटात निबंध लेखन स्पर्धेत ए.टी.झांबरे विद्यालयाची १० वीची विद्यार्थीनी कु.तन्वी मनोज वाघ हिने विशेष गुणवत्ता यादीत यश संपादन केल्याबद्दल जागतिक स्तरावर कार्य करणार्‍या युनो इन्फॉर्मेशन सेन्टर कडून विशेष गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने पालकांसमवेत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापकडी.व्ही चौधरी,शालेय समन्वयक के.जी.पाटील, पर्यवेक्षिका श्रीमती पी.के.झांबरे, शिक्षकवृंद सी.बी.कोळी, व्ही.एस. आर्य, डी.ए.पाटील, पी.के.राणे यांची उपस्थिती होती.

Exit mobile version