Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ढाब्यावर अवैध दारू विक्री करणार्‍यांवर गुन्हा दाखल

FIR

भुसावळ प्रतिसिधी । येथील चाहेल पंजाब ढाब्यावर अवैध दारू विक्री करणार्‍या तिघांवर बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

राष्ट्रीय महामार्गावर असणार्‍या चाहेल पंजाब ढाब्यावर अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती बाजारपेठ पोलीस स्थानकाचे निरिक्षक दिलीप भागवत यांना मिळाली होती. यानुसार रात्री साडेनऊच्या सुमारास कडु तुळशीराम पाटील (रा.जुना सातारा भुसावळ) व लखन एकनाथ भावरे या दोघांना दारूच्या बाटल्यांसह अटक करण्यात आली. संबंधीत ढाबा मालक गुरमंदरसिंग इंदरसिंग चाहेल याचा असल्याचे सांगितले वरुन तिघा विरुद्ध मुंबई प्रोव्हीशन अ‍ॅक्ट कलम-६५ (ई)प्रमाणे कार्यवाही केली आहे.

ही कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली, सहा.पोलीस निरीक्षक अनिल मोरे,संदीप परदेशी पो.ना.रविंद्र बिह्राडे,रमण सुरळकर,तुषार पाटील उमाकांत पाटील, पो.कॉ.विकास सातदिवे,श्रीकृष्ण देशमुख, ईश्‍वर भालेराव,प्रशांत परदेशी यांच्या पथकाने केली आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Exit mobile version