Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ड्रग्ज अ‍ॅडीक्टला झाशीची राणी म्हणतांना लाज वाटली नाही का ? : सचिन सावंत

 

 

मुंबई : प्रतिनिधी । कंगना राणावत हिला भाजपने दिलेल्या पाठबळावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी जोरदार टीका करतांना ड्रग्ज अ‍ॅडीक्टला झाशीची राणी म्हणतांना लाज वाटली नाही का ? असा सवाल केला आहे.

तकरी आंदोलनाला खलिस्तानी संघटनांचा पाठिंबा असल्याचा आरोप भाजपा नेत्यांकडून करण्यात आला होता. त्याचबरोबर आंदोलनात नक्षलवादी आणि देशद्रोही असल्याचं काही भाजपा नेत्यांनी म्हटलं होतं. यावरून काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपाला सुनावलं आहे.

“देशात अन्नदात्याचा सन्मान सर्वोतोपरी आहे. त्याला खलिस्तानी, नक्षलवादी व देशद्रोही म्हणणाऱ्या भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचा, महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांची साथ दिली. मुंबई पोलिसांना माफिया, मुंबईला पाकिस्तान बोलणाऱ्या ड्रग अॅडिक्टला झाशीची राणी बोलवताना लाज वाटली नव्हती का?,” असा सवाल सावंत यांनी भाजपाला केला आहे.

Exit mobile version