Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केला ‘बाहुबली’चा भन्नाट व्हिडीओ

bahubali trump

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत दौऱ्याच्या एक दिवस आधी ‘बाहुबली’चा भन्नाट व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओत ट्रम्प हे ‘बाहुबली’च्या रुपात पाहायला मिळत आहेत.

 

डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया हे २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद, आग्रा आणि नवी दिल्लीला भेट देणार आहेत. त्यानुसार ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. तत्पूर्वी ट्रम्प यांनी बाहुबलीचा व्हीडीओ शेअर करत भारतातील माझ्या सर्वांत चांगल्या मित्रांना भेटण्यासाठी फार उत्सुक आहे, असे म्हटले आहे.

Exit mobile version