Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डोंगर कोठारा येथील महिला सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था

यावल,  प्रतिनिधी । केंद्र व राज्य शासनाने ग्रामस्वच्छतेस प्राधन्य दिलेले असतांना डोंगर कोठारा येथील ग्रामपंचायत प्रशासन बेघर वस्तीत महिलांसाठी असलेल्या सार्वजनिक शौचालयाची वारंवार मागणी करून देखील दुरुस्त  करत नसल्याचा आरोप करत शौचालय तात्काळ  दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. 

 

यासंदर्भातील माहीती अशी की,  डोंगर कठोरा तालुका यावल येथील ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात परसाडे मार्गावरील बेघर वस्तीत असलेल्या महिलांसाठीच्या सार्वजनिक शौचालयाची देखभाल अभावी दुरवस्था झाली असून  ते कुठल्याही क्षणी कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नादुरुस्त शौचालयामुळे महीलांची मोठी गैरसोय होत आहे. याविषयी ग्रामस्थांनी  व महीलांनी वारंवार तोंडी तक्रार ग्राम पंचायतीकडे करून देखील या महिलांच्या व त्या परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर प्रश्नाकडे ग्रामपंचायतीचे कारभारी बेजबाबदारपणे वागणुक देवुन दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी आहेत. दरम्यान पावसाळ्या महीलांसाठी असलेल्या सार्वजनिक शौचालय कोसळल्यास काही अप्रीय घटना घडल्यास यास पुर्णपणे जबाबदारी ही डोंगर कठोरा ग्रामपंचायतीची असणार अशा ग्रामस्थांच्या तक्रार आहे. दरम्यान डोंगर कठोरा ग्रामपंचायतच्या माध्यमातुन मागील दोन वर्षापासुन शासनाच्या विविध विकास कामांसाठीच्या मिळालेल्या लाखो रुपयांच्या निधीच्या माध्यमातून  अत्यंत निकृष्ठ प्रतीची सर्व कामे करण्यात आली आहेत.  या कामांविषयी ग्रामस्थांच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी असतांना ही संबधीत अधिकारी यांच्याकडुन या कामांची गुणवत्ता चौकशी  न करता निकृष्ठ काम करणाऱ्या ठेकेदारांची बिले काढली जात असल्याची डोंगर कठोरा ग्रामस्थांचा आरोप आहे.

Exit mobile version