Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डोंगर कोठारा ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार : प्रांत यांची यावल ग्रामविस्तार अधिकाऱ्यांना नोटीस

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील डोंगर कठोरा ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन गाव हद्दीतील शासकीय जमीन ही रितसर गांवठाणाची कार्यवाही न करता भोगवटादार लावुन गांव नमुना ८ अ तयार केल्याबाबत फैजपुर विभागाचे प्रांतअधिकारी कैलास कडलग यांनी यावल पंचायत समितीचे ग्रामविस्तार अधिकारी व डोंगर कठोरा ग्रामपंचायतीस कार्यवाहीची नोटीस बजावत तीन दिवसात खुलासा सादर करण्याचे सांगितले आहे.

 

या संदर्भात प्रांत अधिकारी कैलास कडलग यांनी मागील आठवड्यात यावल पंचायत समितीचे ग्रामविस्तार अधिकारी व डोंगर कठोरा ग्रामपंचायतीला पत्र पाठवले असुन, या पत्रात असे नमुद केले आहे की , डोंगर कठोरा तालुका यावल या गावाच्या ग्रामपंचायत हद्दीत शासकीय जमीन असलेली गावठाणची जागेची रितसर परवानगी न घेता भोगवटादार लावुन गाव नमुना ८ अ तयार केल्याबाबत तक्रार प्राप्त झाली आये. या अनुषंगाने तसेच सोबत डोंगर कठोरा येथील नमुना ८ अ ची संचिका दाखल आहे. या संदर्भात प्रांतधिकारी कैलास कडलग यांनी संबधीतांना नोटीस बजावुन संपुर्ण कागदपत्रांसह तिन दिवसाच्या आत हजर राहावे अशी सुचना नोटीसीद्वारे दिली आहे. सदरचा खुलासा मुद्दतीत प्राप्त न झाल्यास आपल्याविरुद्ध कायद्याशीर कार्यवाही करण्यात येईल असे नोटीसीव्दारे सुचविण्यात आले आहे.  यासंदर्भात प्रांत कार्यालयाकडुन कुठल्या प्रकारची कार्यवाही करण्यात आली हे मात्र गुलदस्त्यातच आहे.  या विषयाला घेवुन डोंगर कठोरा ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांनी  अतिश्य बेजबाबदारीने वागुन ग्रामस्थांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळवुन देण्याच्या नांवाखाली मोठा आर्थिक व्यवहार करून , शासकीय नियम धाब्यावर ठेवुन हा गोंधळकृत कारभार केल्याची परीसरातील ग्रामस्थांमध्ये उलटसुलट चर्चेस उधाण आले आहे.  या सर्व कारभाराची सीईओ व गटविकास अधिकारी यांनी चौकशी करून सत्य काय ते समोर आणावे अशी मागणी विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रारीव्दारे करण्यात आली आहे.

Exit mobile version