Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डोंगर कठोरा येथे एसएससी बॅच सन ६७-६९ ”गेट टुगेदर” उत्साहत

यावल –  लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील डोंगर कठोरा येथे पन्नास वर्षानंतर शाळकरी मित्र आले एकत्र आगळया वेगळया गेट टुगेदर मेळाव्यात आपल्या शालेय जिवनातील विद्यार्थी मित्रांना पाहुन शालेय जिवनातील जुन्या आठवणीने वातावरण भावनिक झाले.

 

डोंगर कठोरा येथे गुरुवार दि.२२ डिसेंबर  रोजी येथील खंडेराव महाराज मंदिरावर एसएससी बॅच सन ६७-६८ व ६९ च्या काही विद्यार्थी व विद्यार्थिनींचा “गेट टुगेदर “कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला या बॅचमधील काही विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच या बॅचला लाभलेले शिक्षक शिक्षिका जे मयत झालेले यांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहून  कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानिमित्ताने सन ६७-६८ व ६९ च्या विद्यार्थी जीवनातील आठवणींना उजाळा देण्यात आला. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी बालवयातील अनुभव व किस्से कथन करून विद्यार्थी दशेतील जीवनावर प्रकाश टाकला. प्रसंगी या वयोवृद्ध विद्यार्थ्यांनी संगीत खुर्ची खेळून आम्ही अजून जवान असल्याचे दाखवून दिले. या संगीत खुर्ची कार्यक्रमात बालविद्यार्थी पुरुष सुधाकर भालेराव व बालविद्यार्थिनी स्त्री पुष्पा हरी राणे यांनी विजय मिळविला. प्रसंगी सर्व जुन्या बालविद्यार्थ्यांनी बालवयाचा आनंद लुटला. यावेळी शेतकरी,डॉक्टर, शिक्षक, संस्था चालक, संचालक, राजकीय पदाधिकारी, विविध सरकारी पदावर कार्य केलेल्या व आजही काही मंडळी कार्य करीत असल्याबद्दल एकमेकांनी आपआपले अनुभव यावेळी वर्ग मित्रांसोबत शेअर केले.आज घडीला सदरील बॅचचे विद्यार्थी नोकरीनिमित्ताने भारताच्या कानाकोपऱ्यात विखुरलेले असतांना देखील या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नातून हा गेट टुगेदर कार्यक्रम घडून आला.या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांच्या पत्नी व विद्यार्थिनींचे पती यांनी या कार्यक्रमाला लक्षणीय उपस्थिती लावली होती हे विशेष !

यावेळी राजाराम राणे,मधुकर राणे,शरद राणे,सुधाकर भालेराव,डॉ.रवींद्र राणे,उषा चौधरी,पुष्पा पाटील,शकुंतला पाटील,सिंधू पाटील,पुष्पावती राणे,कलिका सरोदे,चिंधू पाटील,विलास राणे,लीलावती भारंबे,प्रमिला झोपे,धनराज बेंडाळे,ज्ञानदेव भिरूड,सुरेश चौधरी,श्रीकृष्णा कुरकुरे,हरी राणे,शरद सरोदे,देविदास विसपुते,बळीराम तायडे,प्रकाश भिरूड,अशोक झांबरे,गणेश भिरूड,हरिश्चन्द्र चौधरी,सुधीर पाटील,गोवर्धन सरोदे,मंदाकिनी कुलकर्णी,गुरुदास भिरूड,मनोहर पाटील,प्रमिला पाटील,प्रकाशकुमार झांबरे,कमल राणे,तुळशीराम राणे,गोविंदा बोरवणकर,दिनकर झांबरे,रजनी राणे,वसंत राणे,सुरेश सरोदे,युवराज झांबरे,दमयंती पाटील यांच्यासह एसएससी बॅच सन ६७-६८ व ६९ च्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन तसेच आभार सुधाकर भालेराव यांनी मानले.  यशस्वीतेसाठी राजाराम बळीराम राणे,शरद मधुकर राणे,मधुकर यशवंत राणे,डॉ.रवींद्र रामकृष्ण राणे,सुधाकर झिपरू भालेराव यांच्यासह एसएससी बॅच सन ६७-६८ व ६९ च्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.

 

Exit mobile version