यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील डोंगरकठोरा येथील जिल्हा परिषद मराठी मुला मुलींच्या शाळेत महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२वी जयंती निमित्ताने १४ एप्रिल रोजी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले.
या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब आढाळे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच नवाज तडवी, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा धनश्री धनगर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रा.पं.सदस्य दिलीप तायडे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य खुशाल कोळी, सुरेश झांबरे हे उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब आढाळे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्रसंगी शाळेतील विद्यार्थिनी परवीन तडवी,वैष्णवी बावस्कर,पूर्वा सोनवणे, पायल राणे,वैष्णवी धनगर यांनी डॉ.आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित विषयांवर भाषणे सादर केले.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब आढाळे,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रा.पं.सदस्य दिलीप तायडे व शाळेचे उप शिक्षक शेखर तडवी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण घेतांना भोगाव्या लागलेल्या यातना, त्यांनी आत्मसात केलेल्या विविध ३२ पदव्या,त्यांच्या कार्याची महती, देशासाठी केलेले योगदान, आपल्या देशाला बाबासाहेबांनी दिलेल्या भारतीय राज्यघटनेची महती अशा विविध विषयांवर माहिती विषद केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार उपशिक्षक शेखर तडवी यांनी मानले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब आढाळे, सरपंच नवाज तडवी, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा धनश्री धनगर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रा.पं.सदस्य दिलीप तायडे,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य खुशाल कोळी, सुरेश झांबरे, मुख्याध्यपिका विजया पाटील, उपशिक्षक शेखर तडवी, राजू तडवी, मुजबेन तडवी, चैताली चौधरी, संजय आढाळे, दिनेश झोपे, डोंगरदा शाळेचे मुख्याध्यापक मुबारक तडवी, उपशिक्षक युनूस तडवी यांच्या सह विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.