Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ. सतीश कोल्हे व डॉ. शर्मिला वाघ यांच्या संशोधनाला पेटेंट 

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विद्यापीठाच्या संगणकशास्त्र प्रशाळेचे संचालक व वरिष्ठ प्राध्यापक डॉ. सतीश कोल्हे व त्यांच्या विद्यार्थीनी डॉ. शर्मिला किशोर वाघ यांनी सायबर सुरक्षेसंदर्भात “सुरक्षित विसंगतीवर आधारित कार्यक्षम प्रत्यक्ष वितरीत घुसखोरी शोध प्रणाली (SABER-DIDS)” साठी विकसित केलेल्या संशोधनाकरिता भारत सरकारचे पेटेंट मिळाले आहे.

इंद्रुजन डिटेक्‌शन सिस्टम (आयडीएस) ही एक अशी प्रणाली आहे जी संशयास्पद क्रियाकलापांसाठी नेटवर्क रहदारीचे निरीक्षण करते आणि जेव्हा अशी क्रियाकलाप आढळली तेव्हा सुचना जारी करते. हे एक सॉफ्टवेअर आहे जे हानिकारक क्रियाकलाप किंवा धोरण उल्लंघनासाठी नेटवर्क किंवा सिस्टम स्कॅन करतो. आणि ती माहिती सामान्यत: प्रशासकाला कळवली जाते किंवा सुरक्षा माहिती आणि कार्यक्रम व्यवस्थापन प्रणाली वापरून केंद्रस्थानी गोळा केले जाते. हि सिस्टीम एकाधिक स्त्रोतांकडून आऊटपुट करते आणि खोट्रया अलार्मपासून क्रियाकलाप वेगळे करण्यासाठी अलार्म फिल्टरिंग तंत्र वापरते.

सायबर सुरक्षेसंदर्भातील टेक्नॉलॉजीतील हे महत्वाचे संशोधन असून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात फार उपयोगाचे ठरणार आहे. एकप्रकारे ते वरदान असणार असून या संशोधनामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व संगणकशास्त्र प्रशाळेच्या गौरवात भर पडली आहे. याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी व प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी प्राध्यापक डॉ. सतीश कोल्हे व त्यांच्या संशोधक चमूचे अभिनंदन केले आहे.

Exit mobile version