Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ संजू भटकर यांना पीएचडी पदवी प्रदान

वरणगाव, प्रतिनिधी । दिपनगर ता.भुसावळ येथील शिक्षक डॉ. संजू भटकर यांना ग्लोबल पीस युनिवर्सीटी यांच्यावतीने नुकतीच पीेएचडी प्रदान करण्यात आली असुन सदरची पदवी प्रदान सोहळा बहादरपूर ता.पारोळा येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आले.

डॉ. संजू भटकर हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे पूर्व सदस्य, महाराष्ट्र शासनाचा श्री संत रविदास पुरस्कार मिळाला असुन भुसावळ येथील माध्यमिक शिक्षकांच्या पतपेढीचे संचालक आहे. त्यानी उत्कृष्ट सूत्रसंचालक, समन्वयक, शिक्षक प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. या कार्याची दखल घेवून त्यांना ग्लोबल पीस युनिर्व्हीसीटीच्यावतीने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मॅगसेस व पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. निलीमा मिश्रा होत्या. यावेळी केंद्रीय मानवाधिकार संघटन नई दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष मिलींद दहिवले होते. या कार्यक्रमात त्यांना सन्मानपुर्वक हि पदवी प्रदान करण्यात आली. या यशाबद्दल त्यांचा विविध शिक्षक संघटनेच्यावतीने गौरव करण्यात आला. यावेळी श्री शारदा शिक्षण मंडळाचे संचालक मिलिंद गाजरे सर्वोदय हायस्कूल किन्ही येथील मुख्याध्यापक डी. पी. साळूंखे, ईब्टा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आर. आर. धनगर भुसावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जे. पी. सपकाळे, शिक्षक परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष एस. एस. अहिरे, इश्तु संघटनचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नरवाडे, ग. स. सोसायटीचे माजी तज्ञ संचालक योगेश इंगळे, भुसाव‌ळ प्राथमिक शिक्षक संघटनेचे संचालक प्रदिप सोनवणे, रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅलीचे सचिव जीवन महाजन, अनिल माळी, शरद पाटील, आर. बी. पाटील, राजु तपकीरे, विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव सुनिल वानखेडे यांनी गौरव केला. 

शिक्षण क्षेत्रातील तज्ञ म्हणून ओळख 

डॉ. संजू भटकर हे गेल्या वीस वर्षापासून शिक्षकांच्या विविध प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करत आहे. ते हजोरो श्रोत्यांना खिळवून ठेवण्यात माहिर असुन रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅलीच्या माध्यमातून कोरोन काळात विविध समाजउपयोगी काम केले आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासोबतच ऑफलाईन शिक्षण कसे देता, यासाठी त्यांना प्रयत्न केले असुन २१ कि.मी मॅराथॉन धावणारे उत्तम धावपटू आहेत.

Exit mobile version