Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ.वर्षा पाटील कॉलेज ऑफ होमसायन्स येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

जळगाव, प्रतिनिधी | सावित्रीबाई फुले यांची जयंती .डॉक्टर वर्षा पाटील कॉलेज ऑफ होमसायन्स जळगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनच्या युनिटद्वारे साजरी करण्यात आली.

 

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्ताने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेविका प्रांजल इसाई हिने उस्फुर्त भाषण केले. ज्यावेळी समाजात स्त्रीला चुल आणि मूल, याशिवाय दुसरे जीवनच नव्हते. त्या काळात ज्योतिबांच्या खांद्याला खांदा लावून पुढाकार घेत भारतातील पहिली स्त्री शिक्षिका होण्याचा मान सावित्रीबाई फुले यांना मिळाला. स्त्री शिक्षणासाठी अखंड कार्यरत फुले दाम्पत्या मुळेच आजची स्त्री आपल्याला शिकत असलेली दिसते. स्त्री शिक्षणासाठी त्यांच्या पुढील आव्हाने, त्यांनी सहन केलेल्या हाल अपेष्टा, अशा अनेक पैलूंचा परिचय करून देण्यात आला. यावेळी प्राचार्या उज्वला मावळे, राष्ट्रीय सेवा योजना प्रोग्राम ऑफिसर मनीषा नाले, कविता देशमुख, रेणुका सूर्यवंशी, कुमारी भुवनेश्वरी नाले आदी शिक्षकवर्ग आणि संपूर्ण राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक उपस्थित होते.

Exit mobile version