Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ. भोळे यांचे विविध क्षेत्रातील कार्ये वाखाणण्याजोगे : प.पू.रविराज दादा पंजाबी

पुणे प्रतिनिधी । हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथे सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र भोळें यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे असे प्रतिपादन रविराज पंजाबी यांनी केले .

कोविड 19 महामारीच्या भयग्रस्त व भीतीयुक्त काळात डॉ. रविंद्र भोळे यांनी अहोरात्र वैदयकीय सेवा केली असून खेडोपाडी असलेल्या रुग्णांची तपासणी केली. औषधोपचार अत्यल्प दरात सेवाभावी प्रवृत्तीने केले. त्यांचे विविध क्षेत्रातील समर्पित भावनेने केलेले रचनात्मक सामाजिक , वैदयकीय कार्ये हे अनमोल आहे. डॉ. भोळे शांतिसेनेचे पुरस्कर्ते व सामाजिक न्यायचे उर्जास्तोत्र असून डॉ. रविंद्र भोळे ह्यांचे विविध क्षेत्रातील समर्पित निष्काम कर्मयोगी कार्ये अनमोल आहे असे प्रतिपादन प.  पु. रविराज दादा पंजाबी ह्यानी येथे व्यक्त केले. गुरुपौर्णिमेच्या पावन स्मृतिदिनानिमित्ताने करोना महामारीच्या काळात सलग साडे तीन महिन्यांपासून वैदयकीय सेवा केल्याबद्दल तसेच कोरोना प्रतिबंधनात्मक कार्ये केल्याबद्दल जेष्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे ह्यांचा सन्मान करण्यात आला.

डॉ. भोळे जवळपास तीस वर्षेहून अधिक काळ गांधीवादी रचनात्मक कार्ये केली आहेत. मराठवाडा भूकंप मराठवाडा,गॅस्ट्रो साथ उरुळीकांचन ,पर्यावरण कार्ये, वृक्षारोपण, अपंगसेवा, दुष्काळग्रस्त मदत कार्ये, स्वयंसेवी संस्थांना आर्थिक मदत मिळून देणे, कार्यकर्त्यांना विविध कार्यक्रमाद्वारे स्फूर्ती देणे, विश्वकर्मा मुक्त विश्व विद्यापीठ मार्फत विविध वोकॅशनल ट्रेनिंग कोर्सेस दिले जातात.  तसेच डॉ. मनिभाई देसाई मानवसेवा ट्रस्ट निती आयोग संलग्नित एनजीओवतीने अनेक उपक्रम राबविले आहेत. डॉ. रविंद्र भोळे आरोग्य सेवा केंद्राद्वारे अत्यल्प दरात वैदयकीय सेवा पुरविली जाते. समाजाभिमुख कार्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

Exit mobile version