Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ. भूषण मगर यांना सेवा गौरव पुरस्कार जाहीर

पाचोरा, प्रतिनिधी | डॉ. भूषण मगर (पाटील) यांना सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था, औरंगाबाद व माणुसकी रुग्णसेवा समुह शासकीय रुग्णालय घाटी, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने पाचव्या वर्धापन दिनानिमित्त वैद्यकीय क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

 

डॉ. भूषण मगर (पाटील) यांना सेवा गौरव पुरस्कार गुरुवार दि. ३० डिसेंबर २०२१ रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मौलाना आझाद संशोधन केंद्र, टी. व्ही. सेंटर, औरंगाबाद येथे प्रदान करण्यात येणार आहे. माणुसकी चा पाचवा वर्धापनदिन सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३१ व्यक्तीचां गुण गौरव या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. त्यापैकी एक जळगाव जिल्ह्यातील डॉ. भूषण मगर (पाटील) यांना वैद्यकीय सेवेतील सेवा गौरव पुरस्कार जाहीर झाला असून ते विघ्नहर्ता मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल, पाचोरा संचालक, डॉ. भूषण दादा मगर फाउंडेशन पाचोरा संस्थापक अध्यक्ष, भोलेनाथ हॉस्पिटल, पारोळा संचालक यांच्या माध्यमातून समाजातील गरीब – गरजू, रुग्णासाठी व्यासपीठ तयार करून सहकारी व मित्र परिवार सोबत घेवून रुग्णसेवक म्हणून सेवा करत असतात.
त्यांना शासकीय सन्मान- तहसीलदार व उपविभागीय दंडाधिकारी, विविध सामाजिक संस्था तर्फे तसेच ए.बी.पी. माझा तर्फे जनसेवेसाठी विशेष सन्मानित करण्यात आले आहे. ते सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असतात अशा या महान कर्तुत्ववान डॉ.भूषण मगर (पाटील) यांना माणुसकी समुहाचा सेवा गौरव पुरस्कारासाठी निवड झाल्या बाबत पत्राद्वारे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक सुमित पंडित यांनी कळविले आहे. ह्या पुरस्काराबद्दल डॉ. भूषण मगर (पाटील) यांचे समाजामध्ये सर्वेत्र कौतुक केले जात आहे.

Exit mobile version