Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ. भागवत कराड यांना भाजपची राज्यसभेसाठी उमेदवारी

मुंबई प्रतिनिधी । औरंगाबादचे माजी महापौर डॉ. भागवत कराड यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी जाहिर केली असून यामुळे एकनाथराव खडसे आणि संजय काकडे यांना धक्का बसला आहे.

भाजपने आधीच केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे तिसर्‍या उमेदवाराबाबत सस्पेन्स निर्माण झाला होता. यातच एकनाथराव खडसे वा संजय काकडे यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. मात्र या दोन्ही मान्यवरांना डावलून डॉ. भागवत कराड यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. ते औरंगाबादचे माजी महापौर असून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. यामुळे अर्थातच खडसे आणि काकडे यांना धक्का बसला आहे.

Exit mobile version