Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ. बेंडाळे महिला महाविद्यालयाचा ८४.२८ टक्के तर आर.आर. कनिष्ठ महाविद्यालयाचा ८२.७५ टक्के निकाल

results 33e9adf0 63e2 11e8 a998 12ee0acfa260

results 33e9adf0 63e2 11e8 a998 12ee0acfa260

जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावी परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यात डॉ.अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाचा एकूण निकाल ८४.२८ टक्के लागला. तर शहरातील आर.आर. कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ८२.७५ टक्के निकाल लागला आहे.

शाखानिहाय निकाल; प्राजक्ता वासूदेव प्रथम
कला शाखेतील विद्यार्थींनी प्राजक्ता वासूदेव हिने ८९.५० टक्के मिळवून महाविद्यालयात प्रथम आली आहे. कला शाखेचा निकाल ६४.९० टक्के, वाणिज्य शाखेचा ९२.८७ टक्के, विज्ञान शाखेचा ८९.६९ टक्के, एच.एस.सी.की.सी. विभागातील एम.एल.टी. शाखेचा ८० टक्के, इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी ९५.८३ टक्के तर अकौंटन्सी अ‍ॅण्ड ऑफोस मॅनेजमेंट शाखेचा ९१.८९ टक्के निकाल लागला आहे.

कला शाखेतून प्राजक्ता वासुदेव ही विद्यार्थिनी ८९.५० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने तर पीयुष संजय वसिष्ट ८८.३३ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. वाणिज्य शाखेतून स्नेहल सोनवणे ही ८६.१५ टक्के गुण मिळवून प्रथम तर कादंबरी राजेंद्र गावंडे ही ८३.०७ टक्के गुण मिळवून द्वितीय तसेच विज्ञान शाखेतून संयुजा शशिकांत टाकळकर ही ८२.६२ टक्के गुण मिळवून प्रथम तर अदिती गुणवंत शिंदे होने ८०.९२ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकाविला. महाविद्यालयाच्या एच. एस. सी. व्ही. सी. विभागाच्या इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी शाखेतून निकीता सोनगीरे व दिपाली प्रवीण कोळी या ७५.३८ टक्के गुण मिळवून तर एम. एल. टी. शाखेतून कोमल कोल्हे ही ६२.१५ टक्के गुण मिळवून तर अकौंटन्सी अ‍ॅण्ड ओ. एम. शाखेतून  निकीता करे ७५.५४ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे गहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गौरी राणे, उपप्राचार्य एस. बी. पाटील, समन्वयक प्रा. एन. जी, बावस्कर यांनी अभिनंदन केले आहे.

आर.आर. कनिष्ठ महाविद्यालय
ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित आर.आर. कनिष्ठ महाविद्यालयाचा ८२.७५ टक्के निकाल लागला आहे. यात विज्ञान विभागातून अभिषेक पाटील ७५.२३ टक्के मिळवून प्रथम, साक्षी लाठी ७४ टक्के मिळवून द्वितीय तसेच वाणिज्य विभागातून मोहित दत्तात्रय ७८ टक्के मिळवून प्रथम, यश चव्हाण ७० टक्के मिळवून द्वितीय, कला विभागातून आकाश पाटील ७६ टक्के मिळवून प्रथम तर विश्वास पावरा ६४.३० टक्के मिळवून द्वितीय ठरला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थाध्यक्ष अरविंद लाठी, दिलीप लाठी, मुकूंद लाठी आदींनी अभिनंदन केले आहे.

Exit mobile version