Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | संविधान जागर समितीतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने दि.६ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता रेल्वे स्टेशन जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संविधान जागर समितीचे व महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलतांना दिली.

 

संविधान जागर समितीतर्फे  आयोजित अभिवादन सभेला जळगावच्या महापौर जयश्री महाजन प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. तेव्हा जळगाव नगरीतील तमाम नागरिकांना अभिवादन सभेत उपस्थित राहावे ही विनंती या अभिवादन सभेत डॉ. प्राध्यापक सत्यजित साळवे मार्गदर्शन करणार असून अध्यक्षस्थानी संविधान जागर समितीचे व महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे राहणार आहे.  तेव्हा अभिवादन सभा यशस्वी करावी असे आवाहन नगरसेवक सुरेश सोनवणे , रमेश सोनवणे , अमोल कोल्हे , हरिचंद्र सोनवणे , भारत ससाणे , दिलीप सपकाळे चंद्रकांत बिरहदे , भारत सोनवणे, संजय सपकाळे समाधान सोनवणे , चंदन बिऱ्हाडे , राजू मोरे , पिंटू सपकाळे , जगदीश सपकाळे , उदय सपकाळे वाल्मीक सपकाळे, मिलिंद तायडे , चंदकांत नन्नवरे इत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांनी केली आहे.

 

 

Exit mobile version