Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती गरजुंना धान्य वाटप करून केली साजरी

कासोदा ता. एरंडोल प्रतिनिधी। कोरोना या संसर्गजन्य साथरोगामुळे संपूर्ण भारतात लॉक डाऊन करण्यात आले आहे. याकालावधी गांवातील हातावर पोट असलेल्यांना उपासमारीची वेळ आली आहे. अशा गरजुंना ब्ल्यू टायगर ग्रुपतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने धान्य वाटप करण्यात आले.

गावांत काहीजण सतरंजी विक्रीचा व्यवसाय करतात तर काही जण मोल मजुरी करतात . त्यांना बाहेर जावे लागते परंतु लॉक डाऊन मुळे घरीच राहावे लागत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा बिकट परिस्थितींना तोंड देण्यासाठी येथील समाज बांधव व ब्ल्यू टायगर गृपने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी न करता मागील वर्षी जयंती उत्सवातील उरलेल्या पैसांचे धान्य खरेदी करून समाजातील गरीब व हातावर पोट असलेल्यांना घरी जाऊन वाटप केले. ब्ल्यू टायगर ग्रुपतर्फे अध्यक्ष करण सोनवणे , उपाध्यक्ष अक्षय पानपाटील यांनी धान्याचे वाटप केले. विशेष म्हणजे याकामी हिलाल खेडकर , बापु सोनवणे , कैलास समशेर, अजय बोदडे , सतीश सोनवणे , वेंडर साहेबराव पानपाटील , राहुल पानपाटील , सोनु मराठे यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version